Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या1246 गावे करोनामुक्त, शाळांचा मार्ग मोकळा

1246 गावे करोनामुक्त, शाळांचा मार्ग मोकळा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविड मुक्त ( Corona free ) ग्रामीण भागातील पहील्या टप्प्यात इयत्ता 8वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग सुरु करण्याच्या मार्गदर्शक सुचना शिक्षण विभागाकडुन ( Dept of Education ) देेण्यात आल्या. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील जवळपास 1927 गावांपैकी कोविड पोझिटीव्ह रुग्ण नसलेल्या 1246 गावांमध्ये नियम अटी पाळून शाळा( Schools ) सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

त्यामध्ये बागलाण मधील सर्वाधिक 143 कोरोनामुक्त गावाचा समावेश आहे. त्या खालोखाल पेठ 142, कळवण 132, दिंडोरी 131, इगतपुरीतील 112 गाव आहे. तर सर्वात कमी प्रत्येकी 28 कोरोना मुक्त गाव सिन्नर आणि सुरगाणातील आहे. कोरोनाच्या स्थितीत बऱ्या पैकी कमी होणारी रुग्ण संख्या लक्षात घेता मह्त्त्च पुर्ण निर्णय घेण्यात आला. मधल्या काळात शाळा बंद मुळे खासकरुन ग्रामीण भागातील मुलांच होणारे शैक्षणिक नुकसान, बालविवाह, बालमजुरी, शाळासोडण्याचे प्रंमाण वाढले होते.

तरच सुरु करता येतील शाळा…

शाळा बंद आणि मुले घरी यामुळे झालेले दुष्परिणाम लक्षात घेता कमी झालेल्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर े शालेय शिक्षण विभागाने 8 ते 12 शाळा सुरु करायचा निर्णय घेतला असला तरीफया शाळा कमीत कमी एक महीना कोविड रुग्न आढळुन न आलेल्या संबंधित गावातच सुरु करता येतील .

कोविड मुक्त गावे

नाशिक -46

बागलाण -143

चांडवड -56

देवळा -37

दिंडोरी -131

इगतपुरी -112

कळवण -132

मालेगाव -99

नांदगाव -79

निफाड -98

पेठ -142

सिन्नर -28

सुरगाणा -28

त्रिबक -30

येवला-85

- Advertisment -

ताज्या बातम्या