Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रसागरी ‘रडार‘ यंत्रणा गेली अडगळीत

सागरी ‘रडार‘ यंत्रणा गेली अडगळीत

विशेष प्रतिनिधी

मुंबई

- Advertisement -

१२ वर्षांपुर्वी मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला आजही अनेक जण विसरु शकले नाही. या हल्ल्यात १९७ जणांचा मृत्यू झाला होता. ८०० पेक्षा अधिक जखमी झाले होते. ९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यापर्यंत ते तीन दिवस देशवासीयांसाठी खूप वेदनादायी होते. परंतु या घटनेतून आपण अजूनही शहाणे झालो नाहीत. या हल्ल्यानंतर २०१२ मध्ये बसवलेली रडार यंत्रणा आज नादुरुस्त होऊन अडगळीत पडली असल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. ही रडार यंत्रणा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाने मुंबई पोलीस आणि नौदलाला दिली आहे.

गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी कोस्टगार्ड आणि नौदलाच्या मदतीने सागरी किनारपट्टीच्या हद्दीत तैनात असलेल्या रडार यंत्रणांभोवती कडक बंदोबस्त ठेवला आहे. तसेच या रडार यंत्रणेसाठी आवश्यक तो निधी पुरवठा तत्काळ करण्यात यावा यासाठी २० सप्टेंबर २०१८ रोजी राज्य तसेच केंद्र सरकारला राज्य पोलिस, कोस्टगार्ड आणि नौदलाने प्रस्ताव पाठवून साकडे घातले आहे. यापुर्वी २॰१४ आणि २५ ऑक्टोंबर २॰१५, २॰१६ रोजी देखील असाच प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र अद्याप त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

या चार ठिकाणी होती यंत्रणा

तारापूर, देवगड, टोळकेश्वर आणि गिरगाव या ठिकाणी २॰१२ साली सागरी सुरक्षेकरीता रडार यंत्रणा बसवण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते या रडार यंत्रणेचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत या रडारमधील एकही यंत्रणा कार्यरत नसल्याची माहिती तटरक्षक दलातील वरिष्ठ अधिकऱ्यांनी दिली.

पॅराशूटच्या सहाय्यानेच रडार उद्ध्वस्त करण्याचा कट

खोल समुद्रात शत्रंूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांचे संदेश पकडण्यासाठी ही रडार यंत्रणा काम करणार होती. यासाठी या यंत्रणेत नेटवर्क कॅाम्प्रेझींग स्टॅटीक रडार आणि इलेक्ट्रो आॅप्टीक सेन्साॅरचे ८४ नियंत्रण कक्ष स्थापन केले होते. मात्र, यातील एकही रडार यंत्रणा कार्यन्वित नाही. त्यातच नेहमीप्रमाणे पॅराशूटच्या सहाय्यानेच ही रडार यंत्रणा उद्ध्वस्त करण्याचा घातकी कट आखल्याची माहिती नौदल, मुंबई पोलीस आणि तटरक्षक दलाला मिळाल्याने या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यापूर्वी म्हणजे २॰१२ च्या सुरुवातीला मुंबई आणि रत्नागिरी येथील किनाऱ्यावर जवळपास तीन मोठी जहाजे भरकटत आली असताना देखील त्याचा तपास ना या रडार यंत्रणांना लागला ना सागरी पोलिसांना. यामुळे सागरी सुरक्षेसाठी कार्यन्वित केलेल्या रडारांच्या क्षमतेत अधिक प्रमाणात कमतरता असल्याचे आढळून आले आहे.

सागरी रडार कशापकारे करते काम ?

रडार यंत्रणा शत्रूचे सांकेतिक संदेश पकडून त्यांची माहिती तटरक्षक दलाला देतात. त्यानुसार तटरक्षक दल सांकेतिक भाषांमध्ये पकडलेले संदेश हे मुंबई पोलीस आणि पश्चिम विभागीय नौदलाकडे पाठवण्याचे काम करतात. तसेच, एखाद्या मशिनवर या रडारच्या लहरी जरी आदळल्या तरी त्याचा धोका या रडारमध्ये असलेल्या नेटवर्क काॅम्प्रेझींग सेन्साॅरच्या माध्यमातून समजतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या