Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यासोसायटीचा स्लॅब काेसळल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

सोसायटीचा स्लॅब काेसळल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

नवी मुंबई | Navi Mumbai

येथील शिलोत्तर रायचूर (सुकपूर) येथील नवीन वसाहतीमध्ये एका सोसायटीच्या तीन मजली इमारतीचे दोन स्लॅब कोसळल्यामुळे (slab collapse) ढिगाऱ्याखाली अडकून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम सुरेश राजभर असे मृत मुलाचे नाव आहे. सुकापुर ग्रामपंचायत (Sukapur Gram Panchayat) हद्दीमध्ये अनेक धोकादायक इमारती असून यातील बहुतांशी इमारती जीर्ण झाल्या असल्या तरी त्यात नागरिक वास्तव्य करत आहेत. इमारती (Buildings)खाली करण्यासाठी नोटिसा देखील बजावण्यात आल्या होत्या. मात्र, नागरिक जीवावर उदार होऊन त्यात राहत आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलातील (Fire Brigade) जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवला असता ढिगाऱ्याखाली बारा वर्षीय शुभम राजभर याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या