Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेश१२ ते १४ वर्षांच्या मुलांचे उद्यापासून लसीकरण; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

१२ ते १४ वर्षांच्या मुलांचे उद्यापासून लसीकरण; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली| प्रतिनिधी New Delhi

देशात आता १२ ते १४ वयवर्ष गटातील लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. उद्या (दि १६) पासून सर्वत्र लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे….(12 to 14 years old children’s vaccination start from tomorrow)

- Advertisement -

याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (union health minister mansukh mandiviya) यांनी दिली. विशेष म्हणजे, आता ६० वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी ‘बूस्टर डोस’लाही मंजुरी देण्यात आली आहे.

लहान मुलांना बायोलॉजिक ईएस कोर्बोवॅक्स कंपनीची लस दिली जाण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

एनटीएजीआयने 12 ते 14 या वयोगटासाठी लसीकरण (Vaccination) सुरू करण्याची शिफारस केली होती. 60 वर्षावरील व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

याआधी 60 वर्षावरील व्यक्तींना बुस्टर डोस (Booster dose) घेण्यासाठी असलेले नियम शिथील करण्यात आले आहे. करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या 24 तासात 4 लाख 61 हजार 318 करोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले आहेत.

आतापर्यंत करोना लसीचे (Corona Vaccination) एकूण 180 कोटी 19 लाख 45 हजार 779 डोस देण्यात आले आहेत. ‘मुलांच्या कुटुंबीयांना आणि ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करत असल्याचे केंद्रीय मंत्री मांडवीय (union health minister mansukh mandiviya) यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या