तुमच्या बालकांचे लसीकरण करायचे आहे?; इथे आजच जा; लसीकरण सुरु आहे…

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

करोना प्रतिबंधक लसीकरणात १२ ते १४ या वयोगटाचा समावेश करण्यात आला असून आजपासून हे लसीकरण सुरु झाले आहे….(12 to 14 years old vaccination started in nashik city)

या अंतर्गत कॉर्बेव्हॅक्स (Corbevax) ही लस देण्यात येत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या (NMC) क्षेत्रात आज (दि १७) पासून १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. देशातल्या करोनाबाधितांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत असून, तिसरी लाट ओसरली आहे.

त्यातच देशातल्या करोना प्रतिबंधक लसीकरणाची आकडेवारीही दररोज वाढते आहे. करोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लस (Vaccination) हेच सर्वांत प्रभावी माध्यम असल्याचे तिसऱ्या लाटेच्या उद्रेकात अधोरेखित झाले. लस घेतलेल्या बहुतांश जणांना करोनाचा संसर्ग झाला नाही.

काही जणांना झाला तरीही त्याची कोणतीही ठळक लक्षणे नव्हती किंवा तो सौम्य होता. लसीकरणामुळे रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले नाही. त्यामुळे आतापर्यंत १५ वर्षे वयोगटपुढील नागरिकांना लसीकरण खुले केले होते. लसीकरणाचे वय आता १२ वर्षांपर्यंत कमी करण्यात आले.नाशिक महापालिकेला ‘कॉर्बेव्हॅक्स’ लशींचे ७ हजार डोस मिळाले आहेत.

आजपासून शहरातील ६ लसीकरण केंद्रांवर (six vaccination center) ही लस देण्यात येणार आहे. शहरातील सहा ही लसीकरण केंद्रावर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने लसीकरणासाठी लाभार्थी नाव नोंदणी करू शकतात. सद्या स्थितीत कोविड विरुद्ध लसीकरण हेच प्रभावी प्रतिबंधनात्मक साधन आहे.

त्यामुळे जानेवारी – फेबुवारी २०२२ मध्ये आलेली तिसरी लाट ही सौम्य होती असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे वरील प्रमाणे सर्व वयोगटातील पहिला किंवा दुसरा डोस घेणे बाकी असलेल्या नागरिकांनी आपले लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे असे आवाहन मनपा आयुक्त कैलास जाधव ,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

ही आहेत लसीकरण केंद्राची नावे

१) मेरी कोविड सेंटर,पंचवटी

२)उपनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपनगर

३)कामातवाडे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,सिडको

४)बारा बंगला (सिव्हील) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,पारिजात नगर

५)इ.एस. आय. एस हॉस्पिटल , सातपूर

६)नवीन बिटको हॉस्पिटल ,नाशिकरोड

उर्वरीत लसीकरणासाठी महानगरपालिकेचे सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालये येथे कोविड १९ लस उपलब्ध आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *