
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
कर्नाटकामधील (Karnataka) चिकबल्लापुरमध्ये आज गुरुवार (दि.२६ ऑक्टोबर) रोजी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर एका उभ्या असलेल्या टँकरला (Tanker) टाटा सुमो कारने समोरुन धडक दिल्याने भीषण अपघात (A Terrible Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू (Death) झाला असून १ जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये ८ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येथील बंगळुरू-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ४४ वर (Bangalore-Hyderabad National Highway) उभ्या असलेल्या एका टँकरला भरधाव टाटा सुमो कारने जोरदार धडक दिली. ही कार बागेपल्लीवरून चिक्कबल्लापूरला जात होती. दाट धुक्यामुळे सुमो चालकाला रस्त्याच्या बाजूला उभा असलेला टँकर दिसला नाही, त्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच या अपघातामुळे (Accident) महामार्गावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर अपघातग्रस्त कार आणि टँकर रस्त्याच्या बाजूला हटविल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, या अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. त्यानंतर काही लोकांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यानंतर अपघातामध्ये मृत्यू (Death) झालेल्या १२ ही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयामध्ये पाठवण्यात आले. तर या अपघाताचा तपास कर्नाटक पोलिसांकडून (Karnataka Police) सुरू आहे.