Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याएकाच दिवशी सिन्नर तालुक्यात आढळले १२ करोनाबाधित

एकाच दिवशी सिन्नर तालुक्यात आढळले १२ करोनाबाधित

सिन्नर | प्रतिनिधी

आज एकट्या सिन्नर तालुक्यात 12 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर सोळा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

सिन्नर शहरात नव्याने पाच तर शिवडे येथे चार व मनेगाव येथे तीन रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील कापसे मळा येथील 50 वर्षीय पुरुष, गोजरे मळा येथील 52 वर्षीय पुरुष, मुक्तेश्वर नगर येथील 41 वर्षीय पुरुष, महालक्ष्मी नगर येथील 35 वर्षीय, समर्थ नगर मधील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

शिवडे येथे 60 वर्षीय महिला, दोन वर्षाचा मुलगा, 24 वर्षाची व 45 वर्षांची महिला यांचा समावेश आहे. मनेगाव येथे 42 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष व 46 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या