उद्यापासून ११ वीची प्रवेश प्रक्रिया होणार सुरु

मराठा विद्यार्थ्यांना घ्यावा लागणार खुल्या प्रवर्गातून प्रवेश
file photo
file photo

मुंबई | प्रतिनिधी

मराठा आरक्षणाला न्यायालयाची स्थगिती असल्यामुळे मराठा आरक्षणाशिवाय आता ११ वी ची प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. याबाबतचे आदेश शिक्षण विभागाने काल काढले आहेत. मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे.

मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच राज्यसरकारनेही या आरक्षणावर ठोस पावले उचललेली नाहीयेत. त्यामुळे शिक्षण विभागाकडून मराठा आरक्षणाशिवाय ११ वी ची प्रवेश प्रक्रिया राबवावी असे आदेश काढले आहेत.

यादरम्यान, मराठा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अशा सर्व विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

मराठा आरक्षणाबाबतचे याचिकाकर्ते दीपक पाटील यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यानेच विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची टीका महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com