औद्योगिक उत्पादनात 11.50 टक्के वाढ

औद्योगिक उत्पादनात 11.50 टक्के वाढ
USER

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने National Statistics Office जुलै महिन्यातील औद्योगिक निर्दैशांक Industrial Indexजारी केला आहे. या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन 11.50 टक्क्यांनी वाढल्याचें दिसत आहे. औद्योगिक निर्देशांकाला कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत विशेष महत्त्व आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत औद्योगिक वाढ कोणत्या वेगाने होत आहे, हे दर्शवत असते. गेल्या वर्षी जुलै 2020 मध्ये औद्योगिक उत्पादनात 10.50 टक्के घट नोंदवण्यात आली होती. या अहवालानुसार या वर्षी जुलै महिन्यात दर महिन्याच्या तुलनेत औद्योगिक उत्पादनात 7.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

जून महिन्यात ही वाढ 5.7 टक्के नोंदवण्यात आली होती. त्या तुलनेत जुलै महिन्यात उत्पादन वाढल्याचें दिसत आहे. जुलै महिन्यात उत्पादन क्षेत्रात 10.50 टक्के वाढ झाली आहे. तर खाण उत्पादनात 19.50 टक्के आणि वीज निर्मिती क्षेत्रात 11.1 टक्क्यांची वाढ झाली आहे.

यावर्षीच्या एप्रिल ते जुलै या दरम्यान आयआयपीची वाढ 34.1 टक्के नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत आयआयपीच्या वाढीत 29.3 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती. मार्च 2020 मध्ये करोना विषाणूच्या संसर्गामुळे औद्योगिक उत्पादनाला मोठा फटका बसला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com