नाशिक शहरात आज एकही मृत्यू नाही; १११ नवे बाधित आढळले

नाशिक शहरात आज एकही मृत्यू नाही; १११ नवे बाधित आढळले
Corona

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात आज २२९ रुग्णांनी करोनावर मात केली. तर आज दिवसभरात २१० नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये नाशिक शहरात सर्वाधिक तर नाशिक ग्रामीणमध्ये त्याखालोखाल रुग्ण आढळले आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जिल्हाबाह्य एका रुग्णाचाही समावेश आहे....

आज दिवसभरात वाढ झालेल्या २१० करोनाबाधित रुग्णांमध्ये नाशिक मनपा क्षेत्रात १११ तर नाशिक ग्रामीणमध्ये ९८ रुग्ण आढळले. मालेगाव मनपा आणि ग्रामीण भागात एकही रुग्ण बाधित आढळून आलेला नाही. तर जिल्हाबाह्य एक रुग्ण बाधित आढळून आला आहे.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार २७९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात ४ रुग्ण दगावले आहेत. यामध्ये नाशिक शहरातील एकही रुग्ण नसून सर्व मृत्यू नाशिक ग्रामीणमधील आहेत.

आज पोर्टलवर ५५ रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे. यामध्ये नाशिक मनपा क्षेत्रातील ३३, मालेगाव मनपा क्षेत्रातील ०१, नाशिक ग्रामीणमधील २१ रुग्णांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com