नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ११ हजार ७८१ रुग्ण करोनामुक्त

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील ११ हजार ७८१ करोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ३३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आत्तापर्यंत ५३३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १४८, चांदवड ३५, सिन्नर १८७, दिंडोरी ६६, निफाड २२१, देवळा १२०, नांदगांव ७९, येवला ०६, त्र्यंबकेश्वर २६, सुरगाणा १५, पेठ ००, कळवण ०२, बागलाण ३२, इगतपुरी ४६, मालेगांव ग्रामीण ४४ असे एकूण १०२७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहेत.

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार १७५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १२८ तर जिल्ह्याबाहेरील ०५ असे एकूण ४ हजार ३३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १६ हजार ६४९ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७०.४२, टक्के, नाशिक शहरात ६९.३१ टक्के, मालेगाव मध्ये ८४.३३ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.७६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७०.९६ इतके आहे.

नाशिक ग्रामीण १२७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३००, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८६ व जिल्हा बाहेरील २० अशा एकूण ५३३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

विशेष म्हणजे, १६ हजार ६४९ करोनाबाधित रुग्णांपैकी ११ हजार ७८१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला असून सध्या जिल्ह्यात ४ हजार ३३५ पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *