लिग्रँड कंपनीत 11 हजार 500 रुपयांची वेतनवाढ; कामगारांना मिळणार 76 हजार बोनस

लिग्रँड कंपनीत 11 हजार 500 रुपयांची वेतनवाढ; कामगारांना मिळणार 76 हजार बोनस

सातपूर | प्रतिनिधी

करोना काळत वेतन कपातीचे सत्र सुरू असताना अंबड औद्योगिक वसाहतीतील नोवातियार इलेक्ट्रिकल अँड डिजिटल सिस्टम प्रा. लि.(लिग्रँड) या कंपनीतील कामगारांचे वेतन वाढीचा करारावर नुकत्याच स्वाक्ष-या करण्यात आल्या आहेत...

या करारानुसार प्रत्येक कामगाराला 11 हजार 550 रुपये वेतनवाढ मिळणार आहे. तसेच दर वर्षी 20 टक्केनुसार सुमारे ७६ हजार रुपये बोनस हा पूर्ण बेसिक डीएवर दिला जाणार आहे यामुळे कामगार वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण आहे

या करारानुसार, कामगारांना 11 हजार 550 रुपये वेतनवाढ मिळणार आहे. तसेच 7 रुपये पर पॉईट या दराने महागाई भत्ता ही मिळणार आहे. दरवर्षी 20 टक्के बोनस (सुमारे ७६ हजार रुपये ) पूर्ण बेसिक डीएवर दिला जाईल.

सदर करारामुळे कामगारांचे वेतन दरमहा 60 हजार सातशे रुपये होईल. याव्यतिरिक्त सेवानिवृत्त झालेल्या कामगारांचाही विचार युनियन आणि व्यवस्थापनाने केला आहे. त्या कामगार कुटुंबास क्याच्या 75 वर्ष होईपर्यंत मेडिक्लेम ची सुविधा चालू राहणार आहे.

त्याचे मासिक हप्ते कंपनी भरणार आहे. यामुळे सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या आरोग्याची काळजी युनियन व्यवस्थापनाने घेतली आहे. याव्यतिरिक्त कामगारांना सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांना दुप्पट ग्रॅज्युएटी देण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.

सध्याच्या कायद्यानुसार, सेवानिवृत्त कामगारांना एक वर्षाच्या सेवेसाठी पंधरा दिवसाचा बेसिक डी ए याप्रमाणे ग्रॅज्युएटी दिली जाते. परंतु या करारानुसार कामगारांना एक वर्षाच्या सेवेसाठी 30 दिवसाचे बेसिक डी ए या दराने सेवेच्या सर्व वर्षासाठी ग्रॅज्युएटी मिळणार आहे.

त्यामुळे कामगारांना सेवानिवृत्त होताना मोठी रक्कम हातात पडेल. कामगारांना टर्म लाइफ इन्शुरन्स योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना वार्षिक वेतनाच्या तीन पट रक्कम मिळेल.

सदर करार एक जुलै 2019 पासून तीन वर्षासाठी म्हणजे 30 जून 2022 पर्यंत लागू राहणार आहे. वेतनवाढीच्या फरका पोटी कामगारांना सुमारे सव्वा लाख रुपये प्रत्येकी मिळतील.

कोरोनामुळे क्षतिग्रस्त झालेली औद्योगिक वातावरणामध्ये हा करार झाल्यामुळे कामगारांनी स्वागत केले आहे. या कराच्या यशस्वीतेसाठी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ. डी एल कराड, नासिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस सिताराम ठोंबरे, उपाध्यक्ष तुकाराम सोनजे, मेंबर सोपान पवार, खुशाल चौधरी, संजीव अहिरराव, बेनीलाल पवार, किशोर कडवे व्यवस्थापनाच्या वतीने असिस्टंट व्हॉईस प्रेसिडेंट नितीन महाजन, अभय तसेच नितीन शिंदे एच. आर. यांनी सह्या केल्या.

यावेळी युनियनचे सेक्रेटरी अरविंद शाहापुरे व सहखजिनदार आत्माराम डावरे, तानाजी जायभावे, कल्पना शिंदेेे, संतोष काकडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

करोना काळात कामगारांना सोशल सिक्युरिटी देण्याचा प्रयत्न होता पीएफच्या पेन्शन योजनेप्रमाणेच उद्योगां द्वारे कामगारांना पेन्शन योजना सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहेत या माध्यमातून कामगारांचे हित साधण्याचा प्रयत्न आहे.

डॉ. डी. एल. कराड

Related Stories

No stories found.