Friday, April 26, 2024
Homeनाशिकअवैध शस्र बाळगणारी टोळी जेरबंद; सहा गावठी कट्टे, ३२ राऊंड हस्तगत

अवैध शस्र बाळगणारी टोळी जेरबंद; सहा गावठी कट्टे, ३२ राऊंड हस्तगत

नाशिक | प्रतिनिधी

अवैध शस्रे बाळगणारी मोठी टोळी जेरबंद करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सहा गावठी कट्टे, ३२ राऊंड हस्तगत करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील एक संशयित आणि एक अल्पवयीन बालक फरार असल्याचे समजते…

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, लासलगावमध्ये एक संशयित अवैध कट्टा बाळगत असल्याची गुप्त माहिती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षकांना प्राप्त झाली होती.

त्यानंतर शिताफीने विपुल यमाजी अहिरे, रा गणेश नगर लासलगाव याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे मिळाली.

यानंतर त्यास पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने त्याचा सोबती शेखर भाई उमर्टी मध्यप्रदेश येथून कट्टे आणून नाशिक जिल्हात विक्री केल्याचे सांगितले.

यानंतर मोठी टोळी असल्याचा अंदाज पोलिसांना आला. त्यानुसार अहिरेचे सखोल चौकशी करत संतोष ठाकरे रा विंचूर याच्याकडून दोन कट्टे व १४ राऊंड, केशव माधव ठोंबरे रा पिंपळद ता चांदवड याच्याकडून एक कट्टा व चार राऊंड, सागर वाघ याच्याकडून एक कट्टा व दोन राऊंड, दीपक पोळ, पंकज वानखेडे, विनोद सोपान तांबे, अजीम अल्ताफ शेख, करण जेऊघाले, पावन नेटारे व सायमन उर्फ पाप मनवेल यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर शेखर आणि एक अल्पवयीन बालक फरार आहे.

वरील कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील व अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक जोपळे, भागवत पगार, दौलत ठोंबरे, योगेश शिंदे, कैलास महाजन, वाडीलाल जाधव, प्रतीप अजगे, गणेश बागुल, शेलार, देशमुख यांनी ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या