क्रेन कोसळली, ११ जणांचा मृत्यू
मुख्य बातम्या

क्रेन कोसळली, ११ जणांचा मृत्यू

विशाखापट्ठनम येथील घटना

jitendra zavar

jitendra zavar

विशाखापट्टनम:

विशाखापट्टनममध्ये हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडच्या कँपसमध्ये क्रेन कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू झाला आहे. विशाखापट्टणममध्ये गॅस गळतीनंतर पुन्हा ही एक मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक मजूर जखमी आहे. शनिवारी दुपारी १२.३० वाजता ही ‌घटना घडली.

लोडिंग कामाची पाहणी करताना क्रेन कोसळल्याने ११ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरु आहे.

Deshdoot
www.deshdoot.com