Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशअर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी तरतूद : भुसावळहून मालवाहतूक कॉरिडोर

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठी तरतूद : भुसावळहून मालवाहतूक कॉरिडोर

नवी दिल्ली :

रेल्वेच्या सेवा सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १.१० लाख कोटींची तरतूद केली आहे. यात नॅशनल रेल्वे प्लॅननुसार २०३० पर्यंत विकास केला जाणार आहे. भुसावळहून नागपूर-खडगपूर-दानकुनी असा मालवाहतुकीचा कॉरिडोर होणार आहे.

- Advertisement -

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. बजेटमध्ये सीताराम यांनी रेल्वे आणि बंदरांचा विकास करण्यासाठी १.१५ लाख कोटींची तरतूद जाहीर केली. यापैकी रेल्वेच्या विकासासाठी १.०७ लाख कोटी देण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमधील खडगपूरहून आंध्र प्रदेशातील विजयवाडापर्यंत १११५ किलोमीटरचा मालवाहतुकीचा कॉरिडोर होणार आहे. तसेच १६७३ किलोमीटरचा पूर्व-पश्चिम कॉरिडोर भुसावळ-नागपूर-खडगपुर-दानकुनी होणार आहे. १९५ किलोमीटरचा राजखर्सवान-कालीपहाडी-अंडाल (पश्चिम बंगाल) कॉरिडोर होईल. तसेच ९७५ किलोमीटरचा उत्तर दक्षिण उप-गलियारा विजयवाडा-नागपूर-इटारसी (मध्य प्रदेश) कॉरिडोर होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या