Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशमोठी बातमी! नक्षलवाद्यांचा जवानांच्या ताफ्यावर हल्ला; ११ शहीद

मोठी बातमी! नक्षलवाद्यांचा जवानांच्या ताफ्यावर हल्ला; ११ शहीद

नवी दिल्ली | New Delhi

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दंतेवाडा (Dantewada) येथे नक्षलवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर हल्ला (Attack) केला असून या हल्ल्यात ११ जवान शहीद (Solder Martyr) झाल्याची माहिती समोर आली आहे…

- Advertisement -

वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का..! नागपुरात फडणवीसांपाठोपाठ अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी (Naxalists) अरणपुरच्या जंगलामध्ये हा हल्ला केला असून नक्षलवाद्यांनी भूसरुंग स्फोटाने जवानांची गाडी उडवली. तसेच अजूनही नक्षलवादी आणि जवान यांच्यामध्ये त्याठिकाणी चकमक सुरु असून येथे मोठ्या प्रमाणात पाऊस (Rain) पडत असल्यामुळे मदत पोहोचणे कठीण होत असल्याचे बोलले जात आहे.

नाशिकमध्ये आयकरची सर्वात मोठी कारवाई; तब्बल तीन हजारांहून अधिक कोटींचे घबाड लागले हाती

दरम्यान, या शहीद झालेल्यांमध्ये १० डीआरजी जवान तर एका चालकाचा समावेश असल्याचे समजते. तसेच स्फोटानंतर परिसर सील करण्यात आला असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सीआरपीएफचे जवान पाठवण्यात आले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या