Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यालहवितजवळ पवन एक्स्प्रेसचे ११ डबे घसरले; एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

लहवितजवळ पवन एक्स्प्रेसचे ११ डबे घसरले; एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इगतपुरीहून निघालेल्या पवन एक्स्प्रेसचे (Pawan Express) ११ डबे नाशिकच्या लहवितजवळ रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

- Advertisement -

लोहशिंगवे येथील मोहमाळ वस्तीलगत पवन एक्सप्रेसचे सुमारे ११ डबे दुपारी 3 वाजेला घसरले.

या अपघातात आतापर्यंत एक मृत्यू आणि तीन ते चार प्रवासी जखमी झाल्याचे समजते.

ग्रामस्थ व आजूबाजूच्या मळेकर यांनी धाव घेत जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

पवन एक्स्प्रेस अपघात : बसेस, रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना

घटनास्थळी रेल्वे पोलीस व प्रशासन दाखल झाले आहेत. प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी मनपाची नाशिक परिवहन महामंडळ लि. सिटी लिंकच्या 26 बस घटनास्थळी रवाना झाल्या आहेत, प्रवाशांना घेवून सर्व बस नाशिकरोड रेल्वे स्थानकात सोडणार असल्याची माहिती व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी दिली.

अपघातानंतर पंचवटीसह ‘इतक्या’ एक्स्प्रेस रद्द; ‘या’ रेल्वेंच्या मार्गात बदल

पंचवटी एक्स्प्रेस सह सुमारे नऊ एक्स्प्रेस अपघातामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबरची सुविधादेखील जारी करण्यात आली आहे.

पवन एक्स्प्रेस अपघात : रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

108 च्या 5 रुग्णवाहिका जखमींच्या मदतीसाठी पाठवल्याची माहिती 108 रुग्ण वाहिका जिल्हा व्यवस्थापक डॉ. अभय सोनवणे यांनी दिली. तर एस टी महामंडळातर्फे १० बस उपलब्ध करून देऊन प्रवाशांना सी बी एस येथे सोडण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या