Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यादहावी बारावीचा निकाल रखडण्याची शक्यता; हे आहे कारण...

दहावी बारावीचा निकाल रखडण्याची शक्यता; हे आहे कारण…

पुणे | Pune

दहावी, बारावीचा निकाल यंदा रखडण्याची शक्यता आहे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पेपर तपासण्यास नकार दिल्यामुळे हा प्रश्न उद्भवण्याची दाट शक्यता आहे….

- Advertisement -

जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत राज्यातील 30 हजार शिक्षकांनी पेपर तपासण्यावर बहिष्कार टाकला असल्यामुळे निकालास उशीर होण्याचे मळभ दाटून आले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, नुकत्याच पार पडलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे एक हजार दोनशेहून अधिक गठ्ठे तपासणीविना पडून असल्याचे समजते आहे.

या आंदोलनानंतर शिक्षण मंडळाकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. परंतु दहावी, बारावीच्या निकालावर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या