Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपालकांना दिलासा : १०२४ महाविद्यालयांचा यंदा शुल्कवाढ न करण्याचा निर्णय

पालकांना दिलासा : १०२४ महाविद्यालयांचा यंदा शुल्कवाढ न करण्याचा निर्णय

पुणे :

कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात शाळा, महाविद्यालय बंद असूनही भरमसाठ शुल्क भरावे लागत आहे. परंतु विद्यार्थी व त्यांचा पालकांना दिलासा देणारा निर्णय राज्यातील १ हजार २४ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात कोणत्याही पद्धतीची शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुल्क नियामक प्राधिकरणाकडून ही माहिती देण्यात आली.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरवर्षी शुल्क नियामक प्राधिकरणाकडून (एफआरए) उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि कृषी विभागातील अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क ठरविण्यात येते. पण यंदा डी-फार्मसी, इंजिनीअरिंग, डिप्लोमा, एमबीए अशा प्रमुख अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

११७ वैद्यकीय महाविद्यालयात जैसे थे शुल्क

राज्यातील ११७ वैद्यकीय महाविद्यालय शुल्कवाढ करणार नाही. त्यात नर्सिंग, बीईएमएस, बीएचएमएस आदी अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या