Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यादिंडोरी तालुक्यात १००४ रुग्णांची करोनामुक्ती

दिंडोरी तालुक्यात १००४ रुग्णांची करोनामुक्ती

ओझे | विलास ढाकणे

दिंडोरी तालुक्यात करोनाने सुरुवातीच्या काळात आक्रमक रूप धारण केले होते. त्यामुळे करोना रग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली होती. परंतु, तालुका आरोग्य विभागाने वेळीच योग्य नियोजन करून कोरोनाच्या साथीवर लक्ष केंद्रित करून रग्ण संख्या कशी कमी होईल यावर भर देत आतापर्यंत जवळ जवळ १००४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

- Advertisement -

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मध्यतंरीच्या काळात करोनाचे वातावरण व्यापक बनले होते. प्रत्येक गावागावांमध्ये कोरोनाने डोकेदुखी वाढविली होती. यावर उपाय योजना म्हणून लाॅकडाऊन घोषणा केली. अगोदर नागरिकांनी याचे काटेकोरपणे पालन केले. परंतु जनतेच्या हलगर्जीपणामुळे एक प्रकारे कोरोनाला बळकटी मिळाली व रग्ण वाढत गेले होते.

यांचा मोठा फटका तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राला मोठा बसला होता. अनेक कामगारांना घराचा रस्ता धारावा लागला. त्यामुळे काही महिने घरी बसल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती.

या सर्व गोष्टीचा विचार करून तालुक्याचे प्रांत अधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी डाॅ कोशिरे यांनी तालुक्यात माझे कुटुंब व माझी जबाबदारी मोहिमेला उच्च मानून तालुक्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत हा संदेश पोहचविला. त्यामुळे दिंडोरी तालुक्यात करोना साथीचा परतीचा प्रवास सुरु झालेला सध्या दिसत आहे.

दिंडोरीतील करोना परिस्थिती

१) आताचे प्रगतीपर पाॅझिटीव्ह रग्ण : ११९०

२) काल पर्यंत नवीन आलेले पाॅझिटीव्ह रग्ण : ०१

३) एकूण बरे झालेले रग्ण : १००४

४) सध्या उपचार घेत असलेले रग्ण : १४८

५) आता पर्यंत मृत्यू : ३८

करोना रग्णांना आपुलकी केव्हा मिळणार

ज्या कुटुंबात एखादी व्यक्ती जर पाॅझिटीव्ह आली तर त्याकडे लोकांची पाहाण्याची भुमीका वेगळी बनते. पॉझिटिव्ह कुटुंबाशी शेजारील संबंध तोडतात. बऱ्याच ठिकाणी अशा कुटुंबाना जीवनआश्यक वस्तुही मिळाल्या नाही.

शेतकरी कुटुंबात जर कुणी पॉझिटिव्ह निघाला तर त्या कुटुंबाकडे मजुर कामाला जात नाही त्तेव्हा चांगली भावना निर्माण करून करोना तून मुक्त झालेल्या रग्णांना आपुलकीने वागणूक देण्याची महत्त्वपूर्ण गरज आहे. अशी भावना एका शेतकरी कुटुंबातील करोना पॉझिटिव्ह रुग्णानी बोलून दाखविली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या