सीम कार्डसाठी ऑनलाईन केवायसी, ऑटो-टेलिकॉम सेक्टरसाठी अनेक घोषणा

सीम कार्डसाठी ऑनलाईन केवायसी, ऑटो-टेलिकॉम सेक्टरसाठी अनेक घोषणा
सीम कार्ड

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. टेलिकॉम सेक्टरसाठी आता शंभर टक्के विदेशी गुंतवणुकीस (FDI) मंजुरी देण्यात आली. यामुळे टेलिकॉम सेक्टरमध्ये गुंतवणुकीसाठी सरकारच्या मंजुरीची गरज राहणार नाही. आता सीम कार्ड घेण्यासाठी कागदपत्र द्यावे लागणार नाही. ऑनलाईन केवासी (kyc) होणार नाही. या विभागात लायसन्स राज संपवण्यात आले आहे.

सीम कार्ड
४९९ रुपयांत करा Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर बुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकूण 26058 कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. वाहन आणि ऑटो कंपोनेंट सेक्टरसाठी पीएलआय योजनेला देखील मंजुरी देण्यात आली आहे. ड्रोनसाठी पीएलआय योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी टेलिकॉम कंपन्यांसाठी पॅकेज मंजूर करण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे.

7.6 लाख नवीन नोकऱ्या

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कॅबिनेटच्या या निर्णयामुळे ऑटो सेक्टरमध्ये 7.6 लाख नवीन नोकऱ्या मिळणार आहे. यामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढणार आहे. पुढील पाच वर्षात यात 47,500 कोटींची नवीन गुंतवणूक होणार आहे.

वाहन उद्योगासाठी पीएलआयची घोषणा

इलेक्ट्रिक वाहनं आणि हायड्रोजन फ्युअल वर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं उत्पादनाशी निगडीत लाभांश देण्याची घोषणा केली आहे. ही योजना 26 हजार कोटींची आहे. या योजनेमध्ये वाहतूक क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं विकसित करण्यात आलं आहे. सीएनजी, पेट्रोल, डिझेलवरील वाहन बनवणाऱ्या कंपन्यांना यामध्ये प्रोत्साहन मिळणार नाही. नवीन पीएलआय योजना 2023 च्या आर्थिक वर्षापासून सुरु होईल. ही योजना तेव्हापासून पुढील पाच वर्षांसाठी सुरु राहील. त्यासाठी 2019-20 हे बेस वर्ष असेल. वाहन उद्योगातील स्पेअर्सपार्टसाठी देखील पीएलआय स्कीम चीघोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 22 पार्टचा समावेश करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com