
मुंबई । प्रतिनिधी Mumbai
स्वित्झर्लंड (Switzerland )येथील डाव्होसमध्ये (Davos )येत्या 16 जानेवारीपासून सुरु होणार्या जागतिक आर्थिक परिषदेत (World Economic Forum) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde )हे शिष्टमंडळासमवेत सहभागी होणार आहेत.
करोनाच्या साथीमुळे डाव्होसची परिषदेच्या मागील दोन बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. तर 2022 या वर्षातली बैठक जानेवारी ऐवजी मे मध्ये घेण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आता होणार्या बैठकीत महाराष्ट्राची चांगली छाप पडावी म्हणून उद्योग विभागाने जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तयारीचा वेळोवेळी आढावा घेऊन महत्वपूर्ण सूचनाही केल्या आहेत.
यावेळी जवळपास 20 उद्योगांसमवेत सुमारे 1 लाख 40 हजार कोटींचे करार होणार असून आजपर्यंत डाव्होस येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच महाराष्ट्राचे सामंजस्य करार होत आहेत.
याशिवाय पायाभूत सुविधा आणि इतर महत्वाच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी जगभरातील मान्यवर, गुंतवणूकदार, तसेच उद्योगांच्या प्रमुखांशीही एकनाथ शिंदे संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांसमवेत शिष्टमंडळात उद्योग मंत्री उदय सामंत तसेच वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग असेल. ही परिषद 20 जानेवारीपर्यंत चालणार असली तरी एकनाथ शिंदे हे 16 आणि 17 जानेवारी असे दोन दिवस परिषदेत सहभागी होणार आहेत.