आता भारतात दहा लाख चाचण्या हाेतील

देशातील शास्त्रज्ञ लस शाेधण्यासाठी प्रयत्न करत आहेत
आता भारतात दहा लाख चाचण्या हाेतील
नरेंद्र माेदीराजकीय

नवी दिल्ली। New Delhi

भारतात सध्या राेज पाच लाख कराेना (Corona Test) चाचण्या हाेत आहेत. येत्या काही दिवसांत १० लाख चाचण्या राेज हाेतील, असे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मुंबई, काेलकाता, नाेएडात करोना टेस्टिंगचे हाई थ्रूपुट (ऑटोमेटेड) सेंटर्सची सुरुवात करताना सांगितले. जानेवारीमध्ये आपल्या देशात करोनाच्या चाचण्या करण्यासाठी एकच लॅब होती. आता संपूर्ण देशात १३०० लॅब्स आहेत. देशातले शास्त्रज्ञ हे करोनाविरोधतली लस शोधण्यासाठी वेगाने कार्य करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान माेदी यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिगच्या माध्यमातून या लॅबचे उदघाटन केले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित हाेत्या.

माेदी यावेळी म्हणाले, येत्या काळात विविध उत्सव देशात साजरे हाेणार आहे. यामुळे खूप खबदरदारी घ्यावी लागणार आहे. कराेनाविराेधात एक संकल्प घेऊन आपणास लढा द्यायचा आहे. प्रत्येक भारतीयास या संकटातून वाचवायचे आहे. भारत आज जगातील सर्वात माेठा पीपीई किट तयार करणारा देश झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com