नाशिक तहसीलला मिळणार नवी इमारत

नाशिक तहसीलला मिळणार नवी इमारत

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात इमारती नसलेल्या तहसील कार्यालयांना (Tehsil Office) आता नवीन इमारत (new building) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी लवकरच निधी (fund) मिळू शकणार आहे.

जिल्हा नियोजन समितीला (District Planning Committee) प्राप्त निधीच्या पाच टक्के निधी सरकारी कार्यालय उभारणे, देखभाल, दुरुस्ती व सुविधा निर्माण करण्यासाठी वापरण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे येत्या आर्थिक वर्षात या निधतून सरकारी कार्यालयांचे (Government offices) प्रश्‍न सुटणार आहेत. यामध्ये नाशिक तहसील कार्यालयाचा (Nashik Tehsil Office) प्राधान्याने विचार होणार आहे.

कारण हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Collector Office) आवारातील जुन्या इमारतीत अडगळीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे मिळणाऱ्या या निधीतून प्राधान्याने नाशिक तहसील कार्यालयाचे नियोजन सुरू असून गडकरी चौकाजवळील प्राप्तीकर विभागाच्या (Income Tax Department) समोर सरकारी गुदामाच्या जागेवर नवीन तहसील कार्यालय उभारले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयतील सूत्रांकडून समजले.

आगामी अर्थसंकल्पाची पूर्वतयारी म्हणून राज्याच्या अर्थमंत्र्यांकडून ऑनलाईन पद्धतीने जिल्हा नियोजन समितीची (District Planning Committee) आढावा बैठक नुकतीच झाली. त्यापार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी (Divisional Commissioner) विभागातील पाचही जिल्ह्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा नियोजन समित्यांना प्राप्त निधीतील

पाच टक्के निधी हा

शासकीय कार्यालयांच्या इमारतींच्या देखभाल- दुरुस्ती व सुविधा पुरवण्यासाठी वापरता येणार आहे. तसेच गरज भासल्यास या निधीतून नवीन इमारत बांधण्यासाठीही निधी दिला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. त्यानुसार हा पाच टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिलया आहेत .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com