नाशिकनंतर दुसरी मोठी दुर्घटना : विरार रुग्णालयास आग: १३ जणांचा मृत्यू

नाशिकनंतर दुसरी मोठी दुर्घटना : विरार रुग्णालयास आग: १३ जणांचा मृत्यू
Breaking News

विरार :

नाशिकमधील ऑक्सिजन टँक लिकेज झाल्यामुळे 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांनीही १३ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.वसईतील वल्लभ कोव्हिड रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Title Name
नाशिक ऑक्सिजन लिकेज : २२ जणांचा मृत्यू, संख्येत वाढ होण्याची भीती
नाशिकनंतर दुसरी मोठी दुर्घटना : विरार रुग्णालयास आग: १३ जणांचा मृत्यू

विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आज पहाटे भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात ९० जण उपचार घेत होते. त्यातील १७ जण आयसीयू वॉर्डमध्ये उपचार घेत होते. यातील १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात रात्री ३ वाजल्याच्या सुमारास ही आग लागली. आग इतकी भीषण होती की, यात अतिदक्षा विभागातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. सध्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले असून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्या नंतर वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त घटनास्थळी उपस्थित नव्हते. केवळ स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची नावे

उमा सुरेश कनगुटकर –महिला

निलेश भोईर – पुरुष

पुखराज वल्लभदास वैष्णव – पुरुष

रजनी आर कडू – महिला

नरेंद्र शंकर शिंदे – पुरुष

कुमार किशोर दोषी – पुरुष

जनार्धन मोरेश्वर म्हात्रे – पुरुष

रमेश टी उपायन – पुरुष

प्रवीण शिवलाल गौडा – पुरुष

अमेय राजेश राऊत – पुरुष

शमा अरुण म्हात्रे – महिला

सुवर्णा एस पितळे – महिला

सुप्रिया देशमुख – महिला

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com