डाेनाल्ड ट्रम्प
डाेनाल्ड ट्रम्प
मुख्य बातम्या

ट्रम्प म्हणतात, दाेन आठवड्यात Good News

कराेनाची तिसरी चाचणी सुरु

jitendra zavar

jitendra zavar

वॉशिंग्टन: washington

करोनासंदर्भात (CoronaVirus) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे वक्तव्य केले आहे. दोन आठवड्यात लशीबाबत , उपचाराबाबत चांगली (Good News) बातमी येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

करोनाच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, करोना लसबद्दल मला इतके सांगायचे आहे की येत्या दोन आठवड्यात चांगली बातमी ऐकायला मिळेल. यासंदर्भात लवकरच महत्त्वपूर्ण घोषणा केली जाणार आहे. दरम्यान, अमेरिकन शास्त्रज्ञांनी बायोटेक्नॉलॉजी कंपनी मॉडर्ना यांनी विकसित केलेल्या संभाव्य कराेना लसची तिसरी चाचणी सुरू केली आहे.

जगभरातील काही मोजक्याच लशींची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, मॉडर्ना इंककडून संयुक्तरीत्या ही चाचणी सुरू आहे. या अंतिम टप्प्यात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना खरी लस देण्यात आली की डमी लस दिली आहे, याची माहिती देण्यात आली नाही.मॉडर्ना लशीच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ४५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला हाेता. या स्वयंसेवकांमध्ये करोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढली होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com