एअर इंडिया
एअर इंडिया
मुख्य बातम्या

कोझिकोडमध्ये का झाली विमान दुर्घटना ?

कोझिकोडमधील रनवे टेबलटॉप का?

jitendra zavar

jitendra zavar

नवी दिल्ली

केरळमधील कोझिकोड विमानतळावर विमान घसरून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 18 लोकांचा मृत्यू झाला. कोझिकोड विमानतळ भारताच्या टेबलटॉप रनवेमध्ये समाविष्ट आहे. टेबलटॉप रनवे हे डोंगराळ भागातील विमानतळावर बनवले जातात. हे रनवे सर्वसाधारण विमानतळाच्या रनवेपेक्षा लहान असतात. त्यामुळे या रनवेवर विमान उतरवणाऱ्या पायलट्सना विशेष प्रशिक्षण दिले जाते. कारण या रनवेच्या दोन्हीबाजूला किंवा एका बाजूला दरी असते. त्यामुळे येथे दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते.

भारतात केरळचे कालीकट आंतरराष्ट्रीय विमानतळ, कर्नाटकच्या मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मिझोरममधील लेंगपुई विमानतळ असे तीन विमानतळ टेबलटॉप रनवे आहे. या विमानतळांवर रनवे डोंगरावर असल्याने लँडिंग करताना पायलटला मैदानी भागासारखा दृष्टी भ्रम होतो. याआधी 2010 साली मंगळुरू येथील विमानतळावर देखील दुबईवरून येणारे एअर इंडियाचे विमान घसरून दरीत कोसळले होते. या घटनेत जवळपास 150 लोकांचा मृत्यू झाला होता. सर्वात जास्त चार टेबलटॉप रनवे नेपाळमध्ये आहेत. त्यानंतर तीन अमेरिकेत तर एक नेदरलँडमध्ये आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com