Type to search

DT Crime Watch Featured जळगाव

यावल : एस.टी.बसमध्ये चोऱ्या करणारे चोरटे गजाआड ; यावल पोलीसांची कामगिरी

Share
Yavas

अरूण पाटील
यावल
एस.टी.बस मध्ये प्रवाशांच्या बँगा कापून चो-या करणारे चार चोरांना यावल पोलीसांनी अंजाळे येथे जाऊन जेरबंद केले.
धडाकेबाज कारवाई.

घटना हकीकत अशी की, आज दि.२ फेब्रुवारी २०२० रोजी पहाटे हा प्रकार घडला.
फिर्यादी सौ.मनाली नितीन मराठे, वय.३२ या भुसावळ ते अंजाळा असे एस.टी.क्र. MH-40-N-9036 ने प्रवास करीत असताना ४ चोरटे नामे- दौजी बाहुरी सिंग वय.४५, रा. UP, रिजवान मुनाफ झोजे वय.३६, रा. UP कदीम मुस्ताक झोजे वय.२६ रा. गुजरात, व खुर्शीद महंमद ईर्शाद वय.२६ रा.UP यांनी प्रवासा दरम्यान फिर्यादी यांची बँग कापून त्यातील सोन्याचे दागिने एकुण ७० ग्रँम किमंत रुपये १,७५,००० चोरी केल्याचे निदर्शनास आले.
बस कंडक्टर यांनी लागलीच फोनव्दारे यावल पोलीस स्टेशनला कळविताच पोलीस निरीक्षक धनवडे यांनी क्षणाचाही विलंब न करता पथकासह घटनास्थळावर धडक देऊन चोरट्यांना तात्काळ जेरबंद केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!