Type to search

Breaking News आवर्जून वाचाच टेक्नोदूत मुख्य बातम्या

व्हॉट्सॲपचे ‘पिक्चर-इन-पिक्चर’ फीचर अपडेट, हा आहे मुख्य बदल

Share

फेसबुकच्या मालकीचे असेलेले इंस्टन्ट मॅसेजिंग व्हॉट्स ॲपने आपल्या ॲन्ड्रोईड वापरकर्त्यांसाठी पिक्चर-इन-पिक्चर (PiP) हे फीचर अपडेट केले आहे. नवीन अपडेटनंतर, व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना एका चॅटवरून दुस-या चॅटवर स्विच करताना पॉप-अप विंडोमध्ये व्हिडिओ पाहता येणार आहे. एवढेच नाही तर, व्हॉट्सॲप बॅकग्राऊंड मध्ये सुरु असेल तरी देखील व्हिडिओ प्ले होईल. आयफोन वापरकर्त्यासाठी एका चॅटवरून दुसऱ्यावर स्विच करताना हे वैशिष्ट्य व्हिडिओ पॉप-अप विंडोमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲपद्वारे ॲन्ड्रोईड वापरकर्त्यांसाठी नवीन अपडेट ‘बॅकग्राऊंड फंक्शनालिटी सपोर्ट’ जोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे अद्याप आयफोनमध्ये देखील हि सुविधा उपलब्ध नाही. व्हॉट्सॲपचा हा नवीन अपडेट सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे व कंपनीच्या व्हॉट्सॲप बीटा प्रोग्रामचा एक भाग आहे.

मागील वर्षी डिसेंबरपासून पिक्चर-इन-पिक्चर (PiP) फिचर ॲन्ड्रोईडचा एक भाग आहे. तथापि, आतापर्यंत हे फिचर वयक्तिक चॅट आणि ग्रुप चॅटमध्ये व्हिडिओ प्लेसह एक लहान पॉप-अप विंडो उघडत असे ज्यात वीडियो सुरु व्हायचा, परंतु आता व्हॉट्सॲप टीमने पीआयपी फिचर अपडेट केले आहे. नवीन अपडेटनंतर, एका चॅटवरून दुसऱ्या चॅटवर स्विच करण्यावेळी आणि होम स्क्रीनवर बॅक करते वेळी व्हिडिओ सुरु असणार आहे.

WABetaInfo ने सांगितले आहे की पीआयपी अपडेट हा अद्यावत व्हॉट्सॲप बीटा आवृत्ती 2.1 9 .177 चा भाग आहे. आम्ही या अपडेट मध्ये पिक्चर-इन-पिक्चर फीचर अपडेटची पळताळणी केले आहे. आपण थेट गुगल प्ले वरुन व्हॉट्सॲप ॲन्ड्रोईडची बीटा आवृत्ती डाउनलोड करू शकता किंवा ॲप्लिकेशन मिररवरून एपीके फाइल डाउनलोड करू शकता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!