Wednesday, April 24, 2024
Homeजळगावकोरोना इफेक्ट : ठरलेला विवाह सोहळा केला रद्द

कोरोना इफेक्ट : ठरलेला विवाह सोहळा केला रद्द

बोदवड – प्रतिनिधी
देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रसार व कलम १४४ जमावबंदी कायदा लागू करूनही परिस्थिती ‘जैसे थेच’ असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे.

त्यामुळे या संचारबंदीचे कोणीही उल्लंघन करू नये असे आदेश सर्वचं जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे तालुक्यात या कायद्याने कोटेकोरपणे पालन केले जात आहे. होणारी गर्दी टाळण्यासाठी व शासनाने संचारबंदी लागू केल्यामुळे बोदवड तालुक्यातील विचवा येथे दि.२४ मार्च रोजी संपन्न होणारा विवाह सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

याबाबत अधिक असे की, तालुक्यातील विचवा येथील रहिवाशी नागुलाल बोंदरीलाल मोहिते यांच्या सुकन्या चि.सौ.कां.रुपा व मध्य प्रदेशातील आजंटी ता.खंडवा येथील रहिवाशी दयाराम तुकाराम चव्हाण यांचे चिरंजीव रोहीत यांचा विवाह दि.२४ मार्च रोजी बोदवड तालुक्यातील विचवा येथे संपन्न होणार होता.

मात्र देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असल्याने व देशात संचारबंदी लागू असल्याने व होणारी गर्दी पाहता हा विवाह सोहळा वधु-वर कडील मंडळींनी रद्द करण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाचे स्वागत गावच्या सरपंच सौ.अनिता जितेंद्र तायडे,पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री.सपकाळे व सामाजिक कार्यकर्ते जितू तायडे यांनी केले असून या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या