Type to search

Featured

शिरपूर : कोरोना आदेशाचे उल्लंघन : दोघांवर कारवाई

Share

शिरपूर – प्रतिनिधी

शिरपूर येथे कोरोना विषाणू बाबत जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पानटपरी चालक व चहा विक्रेता दोघांवीरूध्द शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शहरातील अत्यावश्यक आस्थापन सोडून ईतर आस्थापन बंद ठेवण्याचे आदेश असतांना देखील आज दोन ठिकाणी या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांंवर शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि.२० मार्च ते दि ३१ मार्च पर्यंत शिरपूर तालुक्यातील अभ्यासिका, लग्न समारंभ, रहीवासी वस्तीतील मैदाने, हॉटेल, पानपट्टी, काँफी, ज्युस हाऊस, सर्व हॉटेल, सर्व परमीट रूम व बिअरबार, प्रशिक्षण वर्ग इ. स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे.

त्यानुसार आज दि २१ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, अमित रणमाळे, स्वप्निल बांगर, प्रविण गोसावी आदी जण शासकीय वाहनाने शहरात गस्त घालत असतांना करवंद नाका परिसरात सावता पान सेंटर सुरु असुन पान सेंटरच्या बाजुला मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केल्याचे दिसुन आले.

यानुसार पान सेंटर चालक दिलीप भगवान माळी रा.हुलेसिंग नगर,करवंद नाका याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला तर दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरात एक विनानाव टपरीसद्रुश्य हातगाडीवर चहाची विक्री करत असतांना त्याच्या जवळ लोकांनी गर्दी केलेली होती.

चहा विक्रेता सतिष दगा माळी वय ३७ रा.महात्मा फुले चौक यांना पोलीस स्टेशन येथे आणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पानटपरी चालक दिलीप भगवान माळी व चहा विक्रेता सतिष दगा माळी दोघां विरूध्द व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र (covid-19) उपाययोजना नियम २०२० च्या कलम ११ नुसार भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये दंडनीय अपराध केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!