Type to search

Featured जळगाव

रावेर : बोर्डाच्या परीक्षेच्या भीतीने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Share
Raver

रावेर – प्रतिनिधी

येथील गांधी चौकातील एका उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्याने बोर्डाच्या परीक्षेच्या भीतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

दि.२ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गांधी चौकातील शेख जुनेद शेख रफीक (वय १५ वर्षे) याचा उर्दू माध्यमातून दहावीच्या बोर्डाचा पेपर असल्याने पेपरच्या धास्तीने रेल्वे स्टेशन येथे अप लाईनवर चालू असलेल्या मालगाडीच्या समोर झोकून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या त्या युवकाचा प्राण मोठ्या शिताफितीने तेथे आपली सेवा बजावत असलेले रेल्वेचे कर्मचारी ठाणे अंमलदार त्र्यंबक वाघ, पोलिस कॉन्स्टेबल नरेंद्र लोंढे, आरपीएफ कुहिकर, पॉइन्टसमन अशोक पाटील यांनी त्या युवकास रेल्वे लाईनीतून बाहेर खेचून त्याचे प्राण वाचववून त्याला गांधी चौक येथे त्याच्या घरी जाऊन, पालक शेख रफीक शेख रईस यांच्या स्वाधीन केले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!