ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी ‘प्रहार’चे आंदोलन; आमदार बच्चू कडूंसह कार्यकर्ते ताब्यात
Share

मुंबई । प्रतिनिधी
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राजभवन घेराव आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी हस्तक्षेप करत आमदार बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून आंदोलन गुंडाळले असल्याचे समजते.
परतीच्या पावसाने प्रचंड हाहाकार माजवत शेतकऱ्याच्या हातातोंदाचा घास हिरावला आहे. यंदा राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या अनेक भागांत पिके अक्षरश: वाहून गेली आहेत.
सत्ता स्थापनेच्या घोळाने प्रशासनाचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आमदार बच्चू कडू यांनी आज राजभवनावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते.
मोर्चा पोलीस प्रशासनाने अडविल्यानंतर शेतकरी अधिकच आक्रमक झालेले बघायला मिळाले. सरकार नंतर स्थापन करा आणि आत्महत्येची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्या, अशी मागणी शेतकरी करताना दिसून आले. राज्याच्या विविध भागांतून आलेले शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. तरुणांचा यात मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.