Type to search

Breaking News जळगाव

पारोळा : महामार्गावर पिकअप व टँकरची धडक ; दोन ठार, दोन जखमी

Share

योगेश पाटील

पारोळा

येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.सहावर तुराटखेडे गावालगत पिकअप व टँकरची जोरदार धडक झाल्याने या विचित्र अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना दि.२२ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहीतीवरुन जळगांव येथील मासुमवाडी येथील रहीवाशी शेख इक्बाल शेख तायर (वय २८)  शेख आलताफ शेख वहब (वय ३२) हे कटलरी व्यवसाय करित असल्याने त्यांचे सोबत चालक वसिम पटेल (वय ३०) हे तीन जण आपल्या पिकअप गाडी क्र एम एच १५ इ व्ही २३८१ ने माहीजी येथुन यात्रा आटोपुन धुळे येथील राम बोरीस यात्रेत दुकान लावणेकामी जात असतांना राष्ट्रीय महामार्ग क्र सहावर धुळे कडुन येणारा टँकर क्र एम एच 48 जे 0522 वरिल चालक महेंद्र यादव या दोघांच्या वाहनात धडक झाल्याने या अपघातात शेख इक्बाल,शेख अल्ताफ या दोघांचा जागीच मृत्यु झाला तर टँकर चालक महेंद्र यादव व पिकअप चालक वसिम पटेल हे दोघ जखमी झाले आहेत.

सदर घटनेची माहीती कळताच रुगणवाहीका चालक ईश्वर ठाकुर, मुकेश ठाकुर यांचेसह पोलिसांनी धाव घेतली. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी मदत करित अपघातातुन मयतांना बाहेर काढले.

यावेळी कुटीर रुग्णालयात जखमी महेंद्र यादव यावर डाँ योगेश साळुंखे व डॉ.प्रशांत सोनवणे यांनी उपचार केलेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!