बळी मंदिर चौफुलीवर मंत्र्यांसाठी फौजफाटा तरीही अपघात; बहिणीचा मृत्यू, भाऊ जखमी

0

नाशिक | केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि पालकमंत्री वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी नाशिकमध्ये आहेत. मंत्र्यांच्या दौरामुळे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. असे असतानाही मुंबई आग्रा रस्त्यावर बळी मंदिर चौफुलीजवळ मोटारसायकल आणि ट्रकच्या अपघातात बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर भाऊ गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेत भाऊ प्रफुल्ल चंद्रशेखर खैरनार (वय 22) जखमी असून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शुभांगी चंद्रशेखर खैरनार (वय 27) बहिणीचा मृत्यू झाल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होत आहे.

अधिक माहिती अशी की, शुभांगी आणि भाऊ प्रफुल्ल  मोटारसायकलने जत्रा हॉटेलकडून अमृतधामकडे जात होते.  ट्रक जत्रा हॉटेल कडून औरंगाबाद रोडकडे जात असताना अपघात झाला. यात बहिणीचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शेजारील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विशेष म्हणजे आज संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह  काही मंत्र्यांचा दौरा असल्याने ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. तरीही अपघात झाल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*