Type to search

Featured आवर्जून वाचाच जळगाव शैक्षणिक

नशिराबाद : अबॅकस नॅशनल स्पर्धेत तन्वी पाटील प्रथम

Share
abakus

नशिराबाद, ता.जळगाव । वार्ताहर

येथील श्रवण कॉम्प्युटर्स अबॅकस क्लासची विद्यार्थिनी तन्वी संजय पाटील हीने पुणे येथील बालेवाडी शिवछत्रपती स्टेडीयम मध्ये झालेल्या ‘प्रोअ‍ॅक्टीव्ह अबॅकस’ नॅशनल कॉम्पीटीशन मध्ये ‘सी-4’ या कॅटेगिरीत पहिला क्रमांक मिळविला. तन्वी ही नशिराबाद न्यू इंग्लीश स्कुलमध्ये चवथीच्या वर्गात शिकत आहे.

डिसेंबर 2019 मध्ये नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत श्रवण कॉम्प्युटर्सच्या 13 विद्यार्थ्यांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली होती.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पुणे येथील नॅशनल लेव्हल स्पर्धेत सहभागी होत पहिल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये श्रवण कॉम्प्युटर्सच्या सात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सायली जाधव, आदित्य नाईक, चित्राली पाटील, देवयानी चौधरी, पर्णवी चौधरी, भावेश माळी यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील एकूण 1300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

नॅशनल लेव्हल स्पर्धेत अबॅकसमध्ये घवघवीत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह श्रवण कॉम्प्युटर्सचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!