Type to search

Featured जळगाव

नशिराबाद : शिवजयंती निमित्त प्रथमच ‘शिवरूद्राचे दिग्विजयी तांडव’ कार्यक्रम

Share
Nashirabad

नशिराबाद, ता.जळगाव । वार्ताहर

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या कार्याचे धगधगते महापर्व सांगणारा ‘शिवरूद्राचे दिग्विजयी तांडव’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय सकल मराठा समाज मंडळ नशिराबाद (अण्णानगर) व शिवसह्याद्री प्रतिष्ठान नशिराबाद यांचेतर्फे दि.19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त सायंकाळी 6 वाजता आठवडे बाजार, खालची आळी येथे करण्यात आले आहे.

‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ या एका आगळ्यावेगळ्या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी कार्य, वेगळे पैलू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य मुंबईतील सईशा फाउंडेशन करते आहे. हा कार्यक्रम गीतकार अनिल नलावडे यांनी रचलेल्या 42 गाण्यांवर आधारित आहे.

‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ या एका आगळ्यावेगळ्या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी कार्य, वेगळे पैलू लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने नशिराबाद येथे प्रथमच या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे.

शिवरायांच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच स्वराज्य निर्मितीचे अविभाज्य अंग असलेल्या व्यक्तींच्या समर्पणावर नवगीतांच्या माध्यमातून टाकलेला प्रकाशझोत म्हणजेच ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ हा कार्यक्रम होय.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य, राष्ट्र उभारणीचे पाहिलेले स्वप्न, खडतर प्रवास, लाखमोलाची घडवलेली माणसं, स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग आणि शून्यातून उभे केलेले हिंदवी स्वराज्य या 42 नवगीतांमधून साकारलेल्या संगीतमय शिवचरित्रातून बघायला मिळणार आहे.

या भव्य दिव्य सोहळ्याची जय्यत तयारी आयोजकांनी केली असून डोळ्यांचे पारणे फेडणारा हा कार्यक्रम सर्वांनी बघावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी : कॅबिनेट मंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे, आ.राजुमामा भोळे, आ.चंद्रकांत सोनवणे, मा.खा.ए.टी.पाटील, जि.प.सदस्य लालचंद पाटील, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, डी.वाय.एस.पी. गजानन राठोड, सपोनी प्रविण साळुंखे, सरपंच विकास पाटील, उपसरपंच किर्तीकांत चौबे, माजी सरपंच पंकज महाजन, शिवसेना शहर अध्यक्ष विकास धनगर, नशिराबाद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील, सोमनाथ मराठे, राजकुमार बाफना आर.सी.बाफना ज्वेलर्स जळगाव, अ.भा.सु.क्ष.म.समाज मा.अध्यक्ष भानुदास मराठे, मा.सभापती सौ.यमुनाबाई रोटे, मिलींद दहिवले, शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चव्हाण आदी पदाधिकार्‍यांसह ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!