Type to search

Breaking News Featured नंदुरबार

तोरणमाळ येथे यात्रेला गेलेल्या भाविकांचे वाहन दरीत कोसळले ; दोन ठार, अकरा जखमी

Share
Toranmal accident

नंदुरबार | प्रतिनिधी

तोरणमाळ येथील गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रोत्सवासाठी जाणार्‍या भाविकांचे बोलेरो वाहन खोल दरीत पडल्याने अपघात होवून दोन जागीच ठार तर अकरा जण जखमी झाल्याची घटना आज दि.२१ रोजी सकाळी घडली.

जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तोरणमाळ येथे जाताना सात पायरी घाटात नागार्जून मंदिराजवळ बोलेरो गाडी चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन ३० फूट खोल दरीत कोसळले.

अपघातातील मयत आणि जखमी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रहिवाशी आहेत. मयत प्रवाशांमध्ये तुळशीराम वेलशा पावरा (वय ४२, रा.हरीदोंदवाडा) यांचा समावेश आहे.

तर जखमींमध्ये अनिताबाई फुलाला पावरा (रा.सेंधवा), मेनकाबाई सुनील पावरा (लाडगाव सेंधवा), सुनीताबाई सुशिल पावरा (शिरपूर), सुनील लालसिंग पावरा (लडगाव सेंधवा), कविता तुळशीराम पावरा (हरिदोंदवाडा), सुंदरलाल गल्या पावरा (रोहिणी शिरपूर), राजेश सखाराम पावरा (आंबाखांबा), उमाबाई पवन पावरा (आंबाखांबा), साक्षी गोविंदा पावरा (रोहिणी नवापाडा), जितेश भिकला पावरा (आंबाखांबा) यांचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!