Type to search

Breaking News Featured नंदुरबार

नंदुरबार : आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा ; आदिवासी विकास मंत्री

Share
nandurbar

मुंबई

राज्यातील लॉकडाऊनमुळे राज्यात विविध भागात अडकलेल्या तसेच अन्नावाचून हाल होत असलेल्या आदिवासी बांधवांचा शोध घेऊन त्यांच्या निवाऱ्याची तसेच जेवणाची सोय करण्याचे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी एका संदेशाद्वारे विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आहे.

आश्रमशाळा, वसतिगृह ते आयुक्तालयापर्यंत विविध प्रकल्पांवर कार्यरत सर्व प्रकल्प अधिकारी, अतिरिक्त आदिवासी आयुक्त आणि सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी लिहिलेल्या संदेशात ॲड.पाडवी यांनी म्हटले आहे की, आपणा सर्वांना सद्यःपरिस्थितीबद्दल माहिती आहे. त्याप्रमाणे, आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. त्याच बरोबर राज्यातील आदिवासी बांधवांची काळजी घेण्याची जबाबदारीही आपल्या सर्वांवर आहे.

बरेच आदिवासी बांधव हे विविध ठिकाणाहून घरी जाताना मध्येच अडकलेल आहेत किंवा कामाच्या ठिकाणी अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे आदिवासी गावकरी/पाडा रहिवाशांनाही अन्नधान्य मिळण्यास त्रास होत आहे. आदिवासी भागातील तसेच विविध शहरांमध्ये व खेड्यात अडकलेल्या गरीब, कष्टकरी आदिवासी बांधवांचा शोध घेणे आवश्यक आहे. अशा गरजू आदिवासी बांधवाना अन्न आणि निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी संदेशात म्हटले आहे.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आमच्या सर्व आदिवासी बांधवांसाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मदत करू शकता. कोणत्याही औपचारिक मंजुरीसाठी, ज्यांना मी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशा उच्च अधिका-यांशी आपण संपर्क साधून समन्वयाने सर्व आदिवासी बंधू- भगिनींना सर्वोतोपरी मदत करावी, असे आवाहनही आदिवासी विकास मंत्री ॲड.पाडवी यांनी या पत्राद्वारे केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!