Type to search

Featured धुळे

एटीएम फोडणाऱ्याला दोंडाईचा पोलिसांनी केले अटक

Share

एका आठवड्यातून दोन वेळा चोरट्यांचा प्रयत्न फसला

दोंडाईचा

शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडणाऱ्या चोरटा पोलिसांच्या गस्ती पथकाला रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याने पूर्वीही एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली पोलिसांच्या चौकशी दिली आहे.

पोलिसांच्या गस्तीत फसला चोरीचा प्रयत्न
दोंडाईचा शहरातील शिवाजी रोड वरील जैन मंदिरा शेजारी सेंट्रल बँकेचे शाखा बँकेच्या शेजारी एटीएम आहे गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास एक चोरटा एटीएम मध्ये घुसून कुऱ्हाडीच्या साहाय्याने मशीनची तोडफोड करीत होता.

नेमके त्यावेळी दोंडाईचा पोलिसांचे गस्ती पथकातील उपनिरीक्षक दिनेश मोरे, संजय गुजराती, विनोद पाटील, मोहन पाटील, विश्वेश हजारे, गोपाळ सोनार, शिवाजी निळे, चेतन माळी, विनायक खैरनार, विनायक ठोंबरे शिवाजी रोडवर गस्त घालत होते.

त्यांनी एटीएम मध्ये संशयितच्या हालचाली दिसल्या. त्यांनी जवळ जाऊन बघितलं तर एक चोरटा तोंडाला रुमाल बांधून कुऱ्हाडीच्या साहाय्याने एटीएम मशीन तोडण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांच्या पथकाने अशोक जगन बागुल रा. धांदरणे ता.शिंदखेडा या चोरट्याला अटक केली. त्यानंतर बँकेचे व्यवस्थापक प्रवीण विक्रम गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!