Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार : भाजपाच्या १६ जणांविरूध्द गुन्हे दाखल ; जमावबंदीचे केले...

नंदुरबार : भाजपाच्या १६ जणांविरूध्द गुन्हे दाखल ; जमावबंदीचे केले होते उल्लंघन

नंदुरबार |  प्रतिनिधी  

नंदुरबार येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत संतप्त झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे छायाचित्र असलेले पोस्टर जाळण्यात आले होते.

- Advertisement -

पोलिस प्रशासनातर्फे जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाच्या १६ जणांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथे भारत बचाओ रॅलीला संबोधित करतांना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाला स्वतंत्र करण्यात मोठे योगदान असुन अश्या महापुरुषांबद्दल केलेल्या व्यक्त्व्या मुळे भारतीय जनता पार्टीतर्फे नंदुरबार येथे राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक प्रतिमा असलेले पोस्टर्स रविवारी सायंकाळी दहन करीत जाहीर निषेध करण्यात आला होता.

याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोकॉ. धीरज कोयलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश दिले असतांना कॉंग्रेसचे राहुल गांधी यांचे पोस्टर जाळून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे म्हटले आहे.

त्यानुसार भाजपचे जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, माणिक माळी, केतन रघुवंशी, अनुसूचित जाति मोर्चा जिल्हा अध्यक्ष संतोष वसईकर, शहर अध्यक्ष नरेंद्र माळी, नगरसेवक आनंद माळी, नगरसेवक प्रशांत चौधरी, अशोक चौधरी, दिनेश मोहिते, भरत लोहार, बाबूलाल माळी, निर्मल शर्मा,जयेश चौधरी, प्रकाश चौधरी, सुदाम पटेल, विठ्ठल चौधरी यांच्याविरुद्ध नंदुरबार पोलीस ठाण्यात महा.पो.का.क.३७(१)(३) चे उल्लंघन १३५प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पो.ना.माळी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या