Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

मुश्रीफ नगर, थोरात कोल्हापूर, गडाख उस्मानाबादचे पालकमंत्री

Share
दर आठवड्याला बीडीओ जनता दरबार, Latest News Hasan Mushriff Bdo Meeting Order Ahmednagar

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अपेक्षेनुसार पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.

नगर जिल्ह्याचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आली आहे.

नेवाशाचे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष तथा मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे उस्माबादचा कारभार देण्यात आलेला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!