Type to search

Breaking News Featured जळगाव

ईच्छापूर-निमखेडी : बँक ऑफ महाराष्ट्रच्या कॅशियरला लुटले ; अज्ञात चोरट्यांनी केली मारहाण

Share
किराणा दुकानातील कामगार निघाला चोर, अडीच लाखांची रक्कम हस्तगत ; Grocery store worker theft rupees 2.5 lakhs

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)-

इच्छापूर-निमखेडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत कॅशियर म्हणून कार्यरत असलेल्या श्री.पवार यांना आज सकाळी ११ वाजेदरम्यान ड्युटीवर जात असताना अज्ञात चोरट्यांनी डोलारखेडा-नांदवेल दरम्यान मोटरसायकल अडवून मारहाण करत त्यांचेजवळील रोख पैसे लांबविल्याची घटना घडली.

इच्छापूर-निमखेडी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतील कशियर श्री.पवार हे रोज रावेर ते निमखेडी मोटरसायकलने प्रवास करतात.

आज सकाळी कामावर जात असताना त्यांना डोलारखेडा-नांदवेल दरम्यान अज्ञात चार भामट्यांनी मोटरसायकल आडवी पाडून त्यांना मारहाण केली व त्यांचेजवळील रोख कॅश व अन्य लांबवून पळ काढला.

वढोदा वनपरिक्षेत्रात नेले फरपटत

पुर्णाड फाट्यावरून इच्छापूर निमखेडीकडे जात असनाता श्री.पवार यांना रस्त्यात अडवून मोटरसायकल आडवी पाडून त्यांनी वढोदा वनपरिक्षेत्रा ओढत नेत त्यांना मारहाण करून लुटमार केली. यात ते जबर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती पोलीसांना कळविण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!