Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मालेगाव : पोलीस उपनिरीक्षकाची सर्विस रिव्हाँलवरमधून गोळी झाडून आत्महत्या

Share

मालेगाव : प्रतिनिधी 

मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अझरुद्दिन शेख यांनी त्यांच्याकडील सर्विस रिव्हाँलवरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे, एकीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कोरोना बाबत बैठक सुरु असताना पोलीस ठाण्याच्या आवारातच ही घटना घडल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

अधिक माहिती अशी की, मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढल्यामुळे आजपासून चार दिवस मालेगाव लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, आज पोलिसांची रणनीती काय असेल याबाबतची महत्वाची बैठक शहर पोलीस ठाण्याच्या आवारात सुरु होती.

सायंकाळी साडेचारच्या सुमारास शहर पोलिस उपअधिक्षक रत्नाकर नवले यांचे वाचक असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अझरुद्दिन शेख यांनी महिला समुपदेशन कार्यालयाच्या परिसरात एका झाडाखाली स्वत:च्या सर्विस रिव्हाँलवरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या शेख यांच्या आत्महत्येची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना मिळाली.

यानंतर ताबडतोब बैठक सोडून बशीर शेख यांनी महिला समुपदेशन कार्यालयाकडे धाव घेतली.  वरिष्ठ पोलीस अधिकारी मालेगावी असताना हा प्रकार घडल्यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून अझहर शेख यांची ओळख होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

कोण आहेत अझरूद्दीन शेख?

मूळ जळगाव येथील रहिवासी असलेले अझरोद्दिन शेख हे मालेगाव पोलीस दलात उपनिरीक्षक पदी कार्यरत होते. अझरुद्दीन शेख हे मुंबई पोलिसांत भरती झाले होते. त्यानंतर विभागांतर्गत परीक्षा देऊन ते पोलीस उप्निरीक्षकपदी विराजमान झाले होते. तसेच शेख यांनी सॉफ्टबॉल यांनी उत्तम प्राविण्य मिळवले होते. त्यामुळे त्यांना खेळाडू आरक्षणाचाही फायदा झाला होता.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!