Deshdoot FB Live : (व्हीडीयो) देशदूत संवाद कट्टा : ‘मराठी भाषा गौरव दिन’ विशेष चर्चा

Deshdoot FB Live : (व्हीडीयो) देशदूत संवाद कट्टा : ‘मराठी भाषा गौरव दिन’ विशेष चर्चा

सहभाग : चंद्रकांत भंडारी (शिक्षण समन्वयक), प्रा.योगेश महाले (मु.जे.महाविद्यालय), अरविंद नारखेडे (अभ्यासक लेवा गणबोली), मंगल बी.पाटील (अभ्यासक गुजर बोली)

जळगाव –

मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे, दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत राज्यात मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केले जाते. दरम्यान मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जागतिकीकरणाच्या आजच्या युगात इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत आहे. अशामध्ये अनेक प्रादेशिक भाषा हरवत चालल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषा बोली भाषेत, लिखाणात, श्राव्य साहित्याच्या स्वरुपात टिकवण आवश्यक आहे. मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जातात.

असाच प्रयत्न दै.देशदूतही वृत्तपत्र आणि डिजीटल वेबसाईड, फेसबुक लाईव्ह कार्यक्रमांच्या माध्यमातून करत असतो. याचाच भाग म्हणून ‘मराठी भाषा गौरव दिन’ निमित्त मराठीसह इतर भाषा भगीनी संदर्भात ‘देशदूत संवाद कट्टा’ या कार्यक्रमांतर्गत ‘फेसबुक लाईव्ह’ मधील चर्चा….

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com