Type to search

Featured जळगाव

रावेरला पुन्हा १२ तास संचारबंदी वाढली ; दोन तासांची दिली क्षितीलता

Share
Jalgaon

रावेर | प्रतिनिधी
रविवारी दि.२२ रोजी रावेरला उसळलेल्या दंगलीने संचारबंदी लावण्यात आली होती, मंगळवारी दुपारी दोन तास शिथिलता देऊन, रात्री पुन्हा संचारबंदीत १२ तास वाढ झाली होती.

बुधवारी दुपारी दोन तास सूट दिल्याने नागरिकांनी भाजीपाला व किराणा व दूध घेण्यासाठी कालप्रमाणे आजही गर्दी केल्याचे दृश्य नजरेत पडत होते.
आंबेडकर चौकातील भाजीपाला विक्रेत्यांनी भाज्यांचे दर वाढवून विक्री केल्याने,सर्वसामान्य लोकांना आर्थिक फटका बसला आहे.

मिरच्या, भेंडी, कोबी, भोपळे, गंगाफळ हा भाजीपाला विक्रीसाठी आला होता. यात नियमित भावापेक्षा चढ्या भावाने आज विक्री सुरू होती. दोन तासासाठी हटवण्यात आलेल्या संचारबंदीत नागरिकांना दुचाकी व चारचाकी गाड्या वापरण्यास मनाई करण्यात आली होती.

मात्र नागरिक मोटासायकली घेऊन रस्स्यावर आल्याने प्रांत अधिकारी डॉ.अजित थोरबोले व परिक्षाविधीन उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे,तहसीलदार उषाराणी देवगुणे,वन परिक्षेत्राचे मुकेश महाजन यांनी नागरिकांना स्टेटबँकजवळ अडवून पायीच खरेदीसाठी जाण्याचा सल्ला दिल्याने,वाहन धारकांची चांगलीच दमछाक झाली. काही वाहन चालक ऐकत नसल्याने प्रांतअधिकारी व तहसीलदार यांनी लाठीचार्ज करून वाहन चालकांना चांगलाच चोप दिला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!