Type to search

Featured जळगाव

रावेर येथील क्वॉरंटाईन केलेल्या तिघांना जळगावला तपासणीसाठी पाठवले

Share
Jalgaon Raver

रावेर | प्रतिनिधी –

शहरातील उटखेडा रोडवरील क्वारंटाईन केलेल्या तिघांना शुक्रवारी कोरोना टेस्टसाठी जळगाव रवानगी करण्यात आली आहे.

येथील उटखेडा रोडवरील पती, पत्नी व त्यांची मुलगी इंदौर येथे नोकरी निमित्त राहतात, ते ३० मार्च रोजी रावेर परतले असून, या दरम्यान इंदौर येथे त्यांच्या शेजारीच असलेल्या नर्स कोरोना पोसिटीव्ह आढळून आल्याने, हे दाम्पत्य त्यांच्या संपर्कात आले होते.

तिघांना रावेर ग्रामीण रुग्णालयात बोलवून डॉ.एन.डी.महाजन यांनी त्यांच्यावर उपचार केला असता, यातील महिलेला सर्दीचा त्रास असल्याने,त्यांना क्वारंटाईन करून कोरोना टेस्टसाठी जळगावला रवानगी करण्यात आली आहे.यामुळे आता रावेरात देखील धडकी भरली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!