Type to search

Featured जळगाव

नशिराबाद : दुकानदारांनी ठरलेल्या वेळेतच दुकाने उघडी ठेवावीत; ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती समितीचा आदेश

Share
Jalgaon Nashirabad

नशिराबाद – वार्ताहर
नशिराबाद ग्रामपंचायतीने तयार केलेल्या ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती समितीने बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी उपाय योजना म्हणून अनावश्यक होणारी गर्दी रोखण्यासाठी नशिराबाद गावासह परिसरातील गावांमध्ये अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सर्व दुकानदारांना वेळेचे बंधन पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

यामध्ये किराना दुकान सकाळी ८ ते ११, सायंकाळी ४ ते ७
डेअरी दुग्ध व्यवसाय सकाळी ८ ते ११ सायंकाळी ५ ते ८
फळे व भाजीपाला सकाळी ८ ते ११ सायंकाळी ४ ते ७
चिकन, मटन व अंडी व्यवसाय सकाळी ८ ते ११ सायंकाळी ४ ते ७
मेडीकल व्यवसाय – नियोजित पूर्ण वेळ

याप्रकाणे सर्व दुकानदारांनी आपली दुकाने सुरू ठेवावीत. तसेच या व्यावसायिकांनी किंमती पेक्षा जास्त दराने विक्री केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस व जबाबदारीस सदर व्यावसायिक जबाबदार राहतील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंडविधान संहिता कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल अशा सूचना नशिराबाद ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती समिती अध्यक्ष तथा सरपंच विकास पाटील यांनी केल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!