Type to search

Featured जळगाव

जळगाव : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व.वा.वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन

Share
Jalgaon

जळगाव

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक, कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून शासनातर्फे साजरा करण्यात येतो.

या दिनाचे औचित्य साधून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि व. वा. वाचनालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 27 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता व. वा. वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन व. वा. वाचनालयाचे सचिव मिलींद कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमास प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, जनसंवाद व पत्रकारितेचे विद्यार्थी, साहित्यिक, कवी, लेखक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, माध्यम प्रतिनिधी व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या ग्रंथ प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!