Type to search

Breaking News जळगाव

जळगाव : दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; एक विद्यार्थी ठार, दोन जखमी

Share
Jalgaon

जळगाव
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील स्वामी समर्थ विद्यालयातून हिंदीचा पेपर देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोटरसायकलला ट्रॅक्टरने धडक दिली. यात एक विद्यार्थी ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.

जळगाव एम.आय.डी.सी. परिसरातील हॉटेल निलांबरी जवळ कुंसूंबा येथील शाळेतून हिंदीचा पेपर देऊन घरी जात असताना समोर येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. यात दुचाकी चालक अदनान खान (वय १७) रा. अक्सानगर हा विद्यार्थी जागीच ठार झाला तर शेख मोहंमद (वय १७) रा.तांबापुरा हा गंभीर जखमी झाला. तसेच ट्रॅक्टर चालकही या अपघातात जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!